ग्रामपंचायत शेंदुरजना खुर्द

प्रगती आणि विकास

छायाचित्रे

गावातील सांस्कृतिक कार्यक्रम, सार्वजनिक उत्सव, शासकीय योजना व विकास प्रकल्प यांचे छायाचित्रण या गॅलरीत सादर केले आहे.

गावातील जिल्हा परिषद शाळा मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा यामध्ये विभागातून दुसरा क्रमांक मिळाला आहे शाळेला 1500000 लाख रुपयाचे बक्षीस मिळाले आहे

उत्कृष्ट गावकारभारी सरपंच राज्यस्तरीय पुरस्कार शेंदुरजना माहोरे येथील युवा सरपंच श्री आशिष राजेंद्र माहोरे यांना भरगच्च कार्यक्रमात प्रदान.. दिनांक 23 मे 2025 रोजी शेंदूरजना माहोरे येथे राजीव गांधी कृषी विज्ञान प्रतिष्ठान अमरावतीच्या वतीने दरवर्षीप्रमाणे दिला जाणारा राज्यस्तरीय राजीव गांधी उत्कृष्ट गावकारभारी सरपंच पुरस्कार युवा सरपंच श्री आशिष माहोरे यांना मान्यवरांच्या शुभहस्ते प्रदान करण्यात आला. सदर सन्मान-सोहळ्याचे अध्यक्ष पंचायत समिती तिवसाचे माजी सभापती श्री विलास दादा माहोरे, प्रमुख अतिथी म्हणून ग्रामगीताचार्य सौ. पौर्णिमाताई सवाई, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या संत गाडगेबाबा अध्यासनाचे प्रमुख डॉ.दिलीप काळे, राजीव गांधी कृषी विज्ञान प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री प्रकाश साबळे, कृषी उत्पन्न बाजार समिती तिवसाचे उपसभापती श्री जयकांत माहोरे, तिवसा तालुका सरपंच संघटनेचे अध्यक्ष श्री आशिष बांबल, मोझरीचे सरपंच श्री सुरेंद्र भिवगडे, वर्हा गावच्या सरपंच या सौ नीलिमा समरीत, भारवाडी रवाडी चे माजी सरपंच सचिन राऊत, जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक श्री होले साहेब, ग्रामसेवक श्री पावडे साहेब आदी मान्यवर मंडळी उपस्थित होती. गाव कारभाराच्या विकासासोबतच शेतकरी व शेती विकासाकडे प्राधान्याने लक्ष द्यावे .. सौ पौर्णिमाताई सवाई मनोगत.. गाव कारभारी सरपंचाने शासनाच्या विविध योजना गावातील लोकांपर्यंत पोहोचविण्याची महत्त्वपूर्ण भूमिका बजावावी.. श्री प्रकाश साबळे यांचे मनोगत. याप्रसंगी जिल्हा परिषदेच्या सुंदर शाळेचे मुख्याध्यापक श्री होले साहेब तसेच या गावातील दोन प्रतिष्ठित शेतकऱ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. याप्रसंगी सदर सन्मान सोहळ्यास गावातील लोकांची प्रचंड उपस्थिती होती.. युवा सरपंच श्री आशिष माहोरे यांना उत्कृष्ट गाव कारभारी सरपंच पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

शाळेतील गार्डन

ग्रामपंचायत शेंदूरजना खुर्द येथे अंतविधी योजना सुरु असून गावातील मय्यत व्यक्तीचा पहिल्या दिवसाचा खर्च ग्रामपंचायत करते

ग्रामपंचायत शेंदूरजना खुर्द येथे माहेरची साडी योजना सुरु असून गावातील लग्न होणाऱ्या मुलीला ग्रामपंचायत कडून साडी भेट दिल्या जाते

Scroll to Top